UPCOMING EVENTS


"डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार "


vanarai

EVENT DATE : 13th OCTOBER 2018

'वनराई'चे संस्थापक पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा 'डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार' यंदा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषीशास्त्रज्ञ, भारताच्या हरितक्रांतीचे जनक डॉ.एम.एस. स्वामिनाथन यांना प्रदान करण्यात येत आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरीव कामगिरी करुन राष्ट्रनिर्माणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या श्रेष्ठ व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. शनिवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ५.०० वाजता राजभवन, चेन्नई येथे होणार्‍या या सोहळ्यामध्ये तमिळनाडूचे राज्यपाल मा. श्री. बनवारीलालजी पुरोहित यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. अजयजी संचेती (वनराई फाऊंडेशनचे मार्गदर्शक) असतील तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस व ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री बंसीलाल राठी यांची विशेष उपस्थिती या सोहळ्यास लाभणार आहे. या सोहळ्यास आपली उपस्थिती आम्हास प्रार्थनीय आहे."

vanarai
vanarai
vanarai
2018 All Rights Reserved | Designed & Developed by Applause
DONATE  NOW